Benefits of castor oil एरंड तेलाचे फायदे, तोटे आणि कोणी किती घेतले पाहिजे.

Benefits of castor oil एरंड तेलाचे फायदे: आजच्या ब्लॉग मध्ये आपण एरंड तेलाबद्दल म्हणजेच कॅस्टर ऑइलबद्दल माहिती बघणार आहोत.एरंड ही वनस्पती आपल्या सर्वांनाच माहित आहे, रस्त्याच्या कडेला मोठी मोठी पानं असणारी ही वनस्पती अगदी सहजच आपल्याला कोणत्याही ऋतूमध्ये मिळू शकते,याच्या एरंड्या वनस्पतीच्या बियांपासून तेल काढला जातो,त्याच एरंड तेलाबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत,अगदी जुन्या काळापासून लोक एरंड तेल वापरत आलेले आहेत. 

नमस्कार आरोग्य सल्ला मध्ये आपले स्वागत आहे,आजही कित्येक लोक वेगवेगळ्या त्रासासाठी याचा वापर करतात, पण एरंड तेलाबद्दल आयुर्वेदामध्ये काय सांगितलेला आहे याचे गुणधर्म काय आहेत? कोणकोणत्या आजारांसाठी कोणकोणत्या त्रासासाठी हे फायदेशीर आहे आणि एरंड तेल कोणी कधी कसं आणि किती मात्रेमध्ये घ्यावं अशी सर्व माहिती आपण आजच्या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत, त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी ब्लॉग शेवटपर्यंत पाहा.

Benefits of castor oil एरंड तेल हे सरगुणाचे आहे ज्याच्यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण एरंड तेल घेऊ शकतात कारण हे सौम्य गुणाचे आहे,पोट साफ होताना पोटामध्ये दुखून किंवा मुरडा घेऊन याच्यामुळे त्रास होत नाही व आताच्या सर्व आजारांमध्ये एरंड तेल हे सर्वात उत्तम औषध सांगितलेला आहे. 

एरंड तेल केसांसाठी वापरायचं Benefits of castor oil. 

एरंड तेल लावताना खोबरेल तेल आणि एरंड तेल समप्रमाणामध्ये एकत्र करून ते तेल थोडसं कोमट करून केसांच्या मुळांना आणि केसांना व्यवस्थित लावलं गेलं पाहिजे तुम्हाला जर आयब्रो चे केस वाढवायचे असतील तर इयर बोर्डच्या साह्याने तुम्ही आयब्रोजलाही हे तेल लावू शकता,

याच्यामुळे आयब्रो ची छान वाढ होते पुरुषांना जर दाढीचे केस वाढवायचे असेल तर दाढीच्या केसांच्या वाढीसाठी देखील तुम्ही ह्या तेलाचा वापर करू शकता फक्त तेल कोमट करताना ते डबल बॉयलर मेथडने कोमट केलं गेलं पाहिजे. 

म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे तर एका भांड्यामध्ये पाणी आधी गरम करून घ्यायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये तेलाची वाटी ठेवून ते तेल तुम्हाला कोमट करून घ्यायचा आहे. 

त्याच्यामुळे डायरेक्ट तेलाला लागणार नाही तुम्ही जर तेल डायरेक्ट गॅस वरती गरम केलं तर त्या तेलाचा खरं पाक होऊन तेलामधील गुणधर्म नाहीसे होतात आता या ठिकाणी आपण खोबरेल तेल का वापरलं तर खोबरेल तेल हे थंड गुणाचे आहे त्याच्यामुळे एरंडा तेलामधला उष्ण तीक्ष्णपणा तो उग्रपणा चिकटपणा कमी होण्यासाठी मदत मिळते. 

एरंड तेल केसांसाठी वापरायचं असेल तर तसेही तुम्ही वापरू शकता फक्त ते केस धुतल्यानंतर तेल केसातून पूर्णपणे निघून जाईल याची तुम्हाला काळजी घेतली पाहिजे नाहीतर एरंड तेल चिकट असल्यामुळे केसांमध्ये राहिले तर दूर आणि दूर केसांना लागून केस आणखी खराब होण्याची जास्त शक्यता राहते. 

त्याच्यामुळे शक्यतो हे खोबरेल तेलामध्ये एकत्र करून लावलेलं कधीही चांगलं राहते हे तेल केसांना लावल्यानंतर कमीत कमी दीड ते दोन तास केसांमध्ये राहू द्या किंवा तुम्ही आदल्या दिवशी रात्री हे तेल केसांना लावून दुसऱ्या दिवशी सकाळी केस स्वच्छ धुऊन टाका आठवड्यातून एक ते दोन वेळा हा प्रयोग नक्की करा. 

वात,आमवात,कंबर,पाठ दुखी साठी एरंड तेलाचे फायदे Benefits of castor oil. 

Benefits of castor oil एरंड तेल कंबर पाठ दुखी सारखी जर दुखणे तुमच्या मागे लागले असतील वातामुळे तर ते लोकही एरंड तेल वापरू शकतात कारण एरंड तेलाचे गुण हे वाताच्या विरुद्ध आहेत.

एरंड तेल हे गुरू म्हणजेच जड आहे तर वात हा लघु म्हणजेच हलका आहे एरंडा तेल उष्ण गुणाचे असल्यामुळे वात व कफदोष शामक आहे तर वात हा थंड गुणाचा आहे आणि तेल असल्यामुळे साहजिकच त्याच्यामध्ये स्निग्धपणा असणार आहे तर वातामध्ये रुक्षता कोरडेपणा असतो त्यामुळे वाताच्या सर्व आजारांमध्ये एरंड तेल वापरल्याचे अप्रतिमिम फायदे आपल्याला दिसून येतात.

विशेषतः आमवातासारख्या आजारामध्ये एरंड तेलाचे अप्रतिम फायदे दिसून येतात कारण हे दे पण पाचन करून वाताचे अनुलोमन करतं म्हणजेच आमवाता मधल्या आमचं पचन होऊन त्याच्यामुळे जाठरागणी प्रदीप्त होतो आणि छान कडकडून भूक लागते. 

वेगवेल्या आजारामध्ये एरंड तेलाचे फायदे Benefits of castor oil. 

शरीरामधला वाढलेला वात कमी होण्यासाठी मदत मिळते त्याचबरोबर एरंड तेल सूज आणि वेदनानाशक आहे त्याच्यामुळे आमवातासोबतच इतरही वाताचे आजार जर तुम्हाला असतील तर तुम्ही एरंड तेल नक्की वापरा याचे अप्रतिम फायदे तुम्हाला दिसून येतील. 

Benefits of castor oil एरंड तेल हे तीक्ष्णू कुणाचे आहे त्याच्यामुळे शरीरात सर्व ठिकाणी जाऊन एका काम करते अगदी सूक्ष्म स्रोत नसांमध्ये जाऊन त्या ठिकाणी वाढलेले दोष कमी करण्यासाठी हे मदत करते त्यामुळे विरेशनामध्ये एरंड तेल हे सर्वात श्रेष्ठ सांगितलेला आहे. 

विरेचन ही एक पंचकर्मचिकित्सा आहे ज्यात पोट साफ होण्यासाठी औषधे दिली जातात याच्याबरोबरच गुलमो म्हणजेच गाठी सारखे आजार आहेत उदर म्हणजेच एसआयटी सारखा आजार ताप येत असेल वारंवार थांबून थांबून ताप येत असेल किंवा जुनाट ताप असेल किंवा हृदयाचे आजार असतील तर या प्रत्येक ठिकाणी एरंड तेल वापरल्याचे अप्रतिम फायदे दिसून येतात. 

सुश्रुताचार्यांनी एरंड तेलाचे गुणधर्म सांगताना असं सांगितलेला आहे की ते वय अस्थापक आहे म्हणजेच तारुण्य टिकवण्यासाठी मदत करते. 

त्याच बरोबर हे कामावर्धक आहे म्हणजे शुक्रधातूचा शोधन करून शुक्रधातू वाढवण्यासाठी मदत करते एरंड तेल हे बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे कारण याच्यामध्ये एक प्रकारचा तीक्ष्णपणा सूक्ष्मपणा आहे,याच्याबरोबरच शरीराचे सामर्थ्य वाढवण्यासाठी शरीराची शक्ती वाढवण्यासाठी ही एरंड तेल फायदेशीर आहे. 

त्याचबरोबर हे कांतीवर्धक आहे म्हणजे शरीराची कांती वाढवण्यासाठी मदत करते त्याच्यामुळे याच्या वापरानंतर एक प्रकारची चकाकी येते बघा त्याच्यामुळे बरेच लोक त्वचा आणि केसांसाठी याचा इंटरनल आणि एक्स्टर्नली वापर करताना आपल्याला दिसतात तरी असे काही एरंडतेलाचे गुणधर्म आणि कोणकोणत्या त्रासासाठी एरंड तेल फायदेशीर आहे हे आपण वेगवेगळ्या आचार्यानुसार बघितलं. 

एरंड तेल कोणी घ्यावे Benefits of castor oil. 

एरंड तेल कोणी घ्यावे असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर आता मी ज्या त्रासासाठी एरंड तेल फायदेशीर आहे असं सांगितलं ते त्रास असणारे सर्वजण एरंड तेल घेऊ शकतात याबरोबरच निरोगी स्वस्थ व्यक्ती ही ज्यांना काहीही त्रास नाही ते लोक आणखी हेल्दी राहण्यासाठी एरंड तेल घेऊ शकतात. 

जुन्याकाळी बघा काहीही त्रास नसला तरी वर्षातून दोनदा नित्यनियमाने सर्वजण एरंड तेल घ्यायचे कारण याच्याने कोठा छान साफ व्हायचा शरीराची शुद्धी व्हायची आणि वर्षभर कसलाही त्रास त्या लोकांना होत नव्हता त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण एरंड तेल घेऊ शकतात. 

Benefits of castor oil
Benefits of castor oil

एरंड तेल किती घेतले पाहिजे Benefits of castor oil. 

Benefits of castor oil लहान मुलांना देताना साधारण अर्धा चमचा पासून तुम्ही सुरुवात करू शकता मोठ्या व्यक्तींना देताना एक ते दोन चमचा पासून सुरुवात करत सहा चमचे पर्यंत म्हणजे साधारण 30 एम एल पर्यंत किंवा जास्त हे तुम्ही एरंड तेल देऊ शकता. 

आता या ठिकाणी एरंड तेलाची फिक्स मात्रा का नाही सांगितली तर प्रत्येक व्यक्तीचा कोठा हा वेगवेगळा असतो काहींना थोड्याशा औषधाने पटकन पोट साफ होतं काहींना कितीही औषध घेतले तरी पोट साफ होत नाही त्यामुळे तो डोस त्यांना आपल्यानुसार ऍडजेस्ट करावा लागतो. 

आता हा डोस ऍडजेस्ट कसा करणार तर तेही मी तुम्हाला सांगते समजा तुम्ही आज एक चमचा एरंड तेल घेतलं तुम्हाला काहीही फरक जाणवला नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही दोन चमचे एरंड तेल घ्या पर्वा तीन चमचे एरंड तेल घ्या त्या तीन चमच्याने जर तुमचं व्यवस्थित पोट साफ झालं तर ते तुमच्यासाठी ची एरंड तेलाची योग्य मात्रा आहे. 

ती तुम्ही कंटिन्यू ठेवा जर त्या तीन चमच्याने तुम्हाला जुलाब झाले तर तुम्ही एरंड तेलाची मात्रा कमी करू शकता किंवा तुमचा पोट साफ झाला नाही त्या तीन चमच्याने तर तुम्ही एरंड तेलाची मात्रा वाढवू शकतात अशा प्रकारे तुम्ही डोस ऍडजेस्ट करू शकता. 

एरंड तेल कधी घ्यावे Benefits of castor oil. 

  • एरंड तेल कधी घ्यावे हाही प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल तर दिवसभरात कधीही तुम्ही एरंड तेल घेऊ शकता पण शक्यतो रात्री झोपताना किंवा पहाटेच्या वेळी तुम्ही एरंड तेल घ्या रात्री झोपताना जर तुम्ही घेत असाल तर त्याने झोपमोड होणार नाही ही काळजी तुम्हाला घेतली पाहिजे. 
  • Benefits of castor oil कारण एरंड तेल घेतल्यानंतर दोन तासात तीन तासात की पाच तासात तुमचं पोट साफ होतंय हे प्रत्येकाच्या कोठानुसार वेगवेगळ्या टाईम असणार आहे तर त्याप्रमाणे तुम्ही तसं ऍडजेस्ट करून तो टाईम ठरवून एरंड तेल घेऊ शकता. 
  • ते तेल घेताना शक्यतो ते रिकाम्या पोटी घ्यावं काही जेवल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर एरंड तेल घेऊ नका तुम्हाला खास विरेचनासाठी म्हणजे जुलाबासाठी जर जास्त मात्रेमध्ये एरंड तेल घ्यायचं असेल तर तुम्ही सुट्टीचा दिवस निवडा,तसा त्या त्या वेळेस तुम्हाला वैद्य सांगतीलच. 

 

एरंड तेल घेताना काय काळजी घेतली पाहिजे Benefits of castor oil. 
  • एरंड तेल घेताना ते कशाप्रकारे घ्यावे हेही बऱ्याच वेळा समजत नाही तुम्ही ज्या प्रकारे घेता त्या प्रत्येक एरंड तेल घेऊ शकता आणि वरून गरम पाणी प्या गरम पाणी पिल्यामुळे तोंडामधला चिकटपणा उग्रपणा निघून जाईल. 
  • Benefits of castor oil एरंड तेलाचा उग्र वास असतो चवीलाही फारसं चांगलं नसतं त्याच्यामुळे बऱ्याच वेळा डायरेक्ट ते घेऊ वाटत नाही मग काय करायचं तर गरम चहा मध्ये दुधामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये टाकूनही तुम्ही एरंड तेल घेऊ शकता. 
  • अशा प्रकारे ही जर एरंड तेल तुम्हाला घेऊ वाटत नसेल तर मग काय करायचं तर भाकरीचे पीठ मळताना त्या पिठामध्ये एरंड तेल टाकून तुम्ही भाकरी बनवा आणि ती खा त्याच्यामुळे घ्यायला ही सोपं जाईल आणि तुमचं कामही होईल एरंडतेलाचे बाह्य उपयोगही भरपूर आहे. 
एरंड तेल कोणी घेऊ नये Benefits of castor oil.
  • गर्भवती महिलांनी एरंडेल तेल अजिबात वापरू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे कारण जेव्हा प्रसूती होणार असेल तेव्हा एरंडेल तेलाचा वापर केल्याने प्रसूती वेदना वाढतात आणि प्रसूती लवकर होते , परंतु गरोदर महिलांनी एरंडेल तेलाचे सेवन अगोदर केल्यास गर्भपात होऊ शकतो. 
  • लहान मुलांनी एरंडेल तेलाचा वापर अजिबात करू नये पान तुम्ही लहान मुलांचे  एरंड तेलणे मालीश करू शकतात. 
  • कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असेल तर त्या माणसाने एरंडेल तेलाचा वापर करू नये, त्यात सूज येण्यासारखी समस्या असेल, तर त्यामध्येही एरंडेल तेल वापरू नये.
  • पहिली गोष्ट अशी आहे की तुम्हाला प्रमाण खूप कमी ठेवावे लागेल, फक्त पाच मि.ली. तुम्ही ते नंतर वाढवू शकता, पण सुरुवात ते कमी घेतले पाहिजे कारण त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. 
  • जर तुम्हाला आराम वाटत नसेल तर तुम्ही एरंडेल तेल वापरू नका, जरी तुम्ही अति वापरणे चालू केले असेल किंवा इतर कोणतीही वैद्यकीय समस्या असेल  तर योग्य तज्ञ किंवा डॉक्टरचा सल्ला घ्या. 

तुम्हाला वैद्यकीय संबंधित समस्या असल्यास किंवा गंभीर आजार असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय एरंडेल तेल किंवा एरंडेल तेल वापरू नका.

Benefits of castor oil एरंडा तेलाबद्दल आणखी शंका तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट करून नक्की विचारा माहिती उपयुक्त माहिती एरंडा तेलाबद्दल आणखी शंका तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट करून नक्की विचारा,

उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या ब्लॉगमधील माहितीचा नक्कीच फायदा होईल तसेच आणखी नवीन नवीन माहिती साठी आमचा घरगुती उपचार हा व्हाटस् अप ग्रुप जॉइन करायला विसरू नका धन्यवाद. 

✅👉CLICK HERE TO JOIN WHATSAPP GROUP ✔️

Leave a Comment