खोकला घरगुती उपाय Home remedies for cough.

खोकला घरगुती उपाय आरोग्य टीप्स,सध्याच्या काळामध्ये असलेली आपली विचित्र जीवनशैली ही आपल्या शरीरासाठी अयोग्य अशीच आहे,आपल्या बदललेल्या खाण्याचा वेळा आणि त्याचबरोबर सतत बाहेर खाणं,यामुळे शरीरावरती वाईट परिणाम होत असतो.

अर्थातच मग त्यातनं काही विकार उद्भवले की आपण लगेचच डॉक्टरकडे वळतो आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या औषध घ्यायला लागतो,पण असं न करता जर आपण आपल्या स्वयंपाक घराकडे वळलो तर त्यातून सुद्धा आपल्या शरीरावरती आपल्याला योग्य पद्धतीने उपचार करता येतात ,खोकला घरगुती उपाय कसे ते पाहूया ऋतू बदलामुळे अनेकांना सर्दी खोकल्यासारखे आजार झाल्याचे आपल्याला सर्रास दिसून येते यावरती सोपे आणि घरगुती उपाय कसे करू शकतो.

 खोकला घरगुती उपाय Home remedies for cough.

खोकला घरगुती उपाय एक नंबर पाहूयात 

खोकला घरगुती उपाय दोन नंबर 15 ते 20 तुळशीची पानं दीड कप पाण्यात उकळवा, दहा मिनिटांनी हे मिश्रण गाळून घ्या, त्यात चमचाभर लिंबाचा रस मिसळा,लिंबाच्या रसात क जीवनसत्व असल्यामुळे हे प्यायल्याने तुमची रोग प्रतिकारक शक्ती नक्कीच वाढू शकते.

खोकला घरगुती उपाय तिन नंबर ग्लासभर पाण्यात दोन ते तीन कडुनिंबाची पानं टाकून,हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात चमचाभर मध घालून गुळण्या करा,त्यामुळे तुमची घसा दुखी नक्कीच बरी होऊ शकते.

खोकला घरगुती उपाय चार नंबर चार ते पाच काळी मिरीचे दाणे थोडे जिरे आणि गुळ पाण्यात एकत्र करा हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर थोडा थंड करून ते प्या,त्यामुळे कफाचा खोकला कमी होण्यास तुम्हाला मदत होईल.

खोकला घरगुती उपाय पाच नंबर सुपारीची पानं कुटून रस काढून,त्यामध्ये एक चमचा मध घाला, हे मिश्रण रोज दोन वेळा जेवणानंतर अर्ध्या तासाने घ्या,त्यामुळे तुमचा कफाचा खोकला नक्कीच बरा होऊ शकतो. 

आलं बारीक कापून त्याचा रस काढा, त्यात काळी मिरीच्या दाण्याची भाजून केलेली पावडर, थोडे मध आणि चिमूटभर हळद घाला,हे मिश्रण एकत्र करून छोट्या छोट्या गोळ्या अधून मधून सगळा त्यामुळे सर्दी खोकल्यावर आराम मिळू शकतो.

चार कप पाण्यात एक छोटा चमचा हळद घालून उघडा आणि दहा मिनिटांनी तो गाळून त्यात थोडेसे मध आणि लिंबू पिळून प्या ते उकळताना त्यामध्ये तुम्ही तुळशीची पानं देखील घालू शकता हा उपाय सर्दी आणि घसा दुखीवर परिणामकारक आहे तर मग हे घरगुती उपाय नक्की करून पहा.

जर का खोकला येत असेल आणि त्याला आवाज येत असेल,तर किंवा तो खोकला बाहेर पडतच नाही तर खोकताना खूप छातीत दुखतय ओटी, पोटामध्ये दुखतंय बाथरूमला च्या वेळेला त्रास होतोय, अशी जर भावना होत असेल,कारण की तो खोकलाच इतका जोरात असतो की,आपण ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो,तर तो जो खोकला आहे ,सगळ्यात पहिले गोष्ट लक्षात घ्या, की आत्ता जो खोकला येतो.

त्याबरोबर जर का ताप असेल डोकेदुखी असेल तर तुम्ही जास्त टेन्शन घ्या,पण नुसता जर तुम्हाला खोकला असेल तर एवढं घाबरू नका,तो घरगुती उपायाने आणि डॉक्टरांच्या उपायाने तो बरा होतो,जेवढं तुम्ही जास्त घाबराल,तेवढे तुम्हाला झोप लागणार नाही.

खोकला घरगुती उपाय 1

खोकला घरगुती उपाय खोकला येत असेल तर आहार काय घ्यावा?

चिंच,बोर या सारख्या आंबट गोष्टी पूर्ण टाळायच्या आहेत,जेवणामध्ये तुम्ही गरम गरम दूध भात घेऊ शकता,किंवा मुगाचा मस्त केलेलं वरण आणि भात असं गरम गरम खायचं, या दोन्हीची पेज करून सुद्धा तुम्ही दिवसातून दोन वेळा घेऊ शकता,

त्याच्यामध्ये थोडसं हळद टाका,जिरे पावडर टाका, थोडेसे हिंग टाका, काळीमिरी टाका ,बघा एकदम तिची ढास असते ना ते ढास याची कमी होते,जेवताना एकच दिवस दिवसातून दोन वेळेला असं हे अगदी पोटभर पेज प्या.

तुम्हाला दहाशेची बंद होते आणि एक महत्त्वाचं म्हणजे,एक कांदा घ्या एका कांद्याचा मिक्सर मधनं रस काढा,मिक्सरमध्ये पूर्णपणे ते क्रश करा,त्यातला कचरा सगळे बाजूला करा, तो रस घ्या, त्या  कांद्याच्या रसामध्ये थोडासा एक अर्धा चमचा मध टाका, आणि छोटा आल्याचा तुकडा टाका, जेव्हा तुम्ही कांदा मिक्सरमधनं काढतात त्याच वेळेला त्याच्यामध्ये तुकडे करून टाका,म्हणजे आल्याचा कांद्याचा रस हे मधातून एक एक चमचा म्हणजे पाच पाच एम एल घ्या,तर हे दिवसातून तीन वेळेला चाटण सारखं घ्या. 

या मुळे भूकही छान लागते,  तुमच्या पोटाच्या तक्रारी कमी होतात,घशाला याप्रमाणे  इफेक्ट मिळतो, त्याच्यामुळे आणि घशात खवखव असेल ती सुद्धा कमी होते,असे दिवसातून फक्त तीन वेळा दोनच दिवस घेऊन बघा,तुम्हाला फरक हा जाणवलाच पाहिजे, आणि फरक वाटला तर पुढे दिवस एक दोन तीन दिवस कंटिन्यू करा त्याच्यामुळे तुमचं लंग इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते,आणि खोकला वाढत नाही, आणि खोकला ही गोष्टच अशी आहे की जसा वाढतो, तसा तो आपोआप कमी पण होतो.

खोकला घरगुती उपाय छातीमध्ये कफ झाला असेल तर काय करायचं?

खोकला घरगुती उपाय छाती मध्ये जर कफ जमा झाला असेल तर हा घरगुती उपाय करा,तिळाचे तेल जे असतं ते थोडसं गरम करा, तिळाचं तेल गरम करून,त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाका,थोडासा कणभर आणि ते तिळाचं तेल आणि सिंधीलोन,हिंग आणि तिळाचं तेल असं तिन्हीच असा लेप आपल्या छातीला आणि पाठीला लावा त्याने सुद्धा कफ निघून जायला मदत होते.

आणि आपल्याला खोकताना जो त्रास होत असतो तो त्रास आहे अजिबात होत नाही,आणि एक लक्षात घ्या,खोकला हा हळूहळू सुरुवातीला जरा येतो,मग वाढतो मग थांबतो मग नंतर बरेच दिवस खोकला येत जातो,आणि आपण इलेटेड होत राहतो,पण हे उपाय करून बघा तुमचा खोकल्यामधलं जे लंग इन्फेक्शन असतं हे अजिबात वाढणार नाही,तुमचा खोकल्याचा त्रासही कमी होईल.

त्याचप्रमाणे जेव्हा खोकला असतो त्यावेळेला भुकेची तक्रार असते, छातीत दुखत असतं ओटी पोटामध्ये दुखत असतं किंवा आपला जो आपलं जे पोट असतं तेही बऱ्याच वेळेला खोकून खोकून दुखत,आपल्या अशा आतडी दुखायला लागतात,ती सुद्धा त्रास होत नाही बघा हा उपाय करून बघा नककी फरक जाणवेल.

खोकला घरगुती उपाय
खोकला घरगुती उपाय

कोरडा खोकला घरगुती उपाय.

तुम्ही कोरड्या खोकल्याने त्रस्त असाल,आणि हा खोकला जर बरा होतच नसेल,तर तुम्हाला काळजी घेणं आणि वेळेवर लक्ष देणे गरजेचे आहे,कोरडा खोकला कोणत्याही हंगामात होऊ शकतो,तुम्हाला कोणतीही एलर्जी असेल किंवा प्रदूषणाचा त्रास असेल तर कोरडा खोकला हा निश्चित होतोच,खरं तर कोरड्या खोकल्यामध्ये कफ नसतो आणि घसा कोरडा पडून तुम्हाला सतत खोकला येत राहतो.

यावर तुम्ही खोकला घरगुती उपचार देखील करू शकता ,तुळस ठरते फायदेशीर आहे,तुळशीच्या पानांचा वापर करून तुम्ही कोरड्या खोकल्यापासून सुटका मिळू शकतात,तुळशीची काही पाने पाण्यात उकळून घ्या,गरज असेल तर यामध्ये थोडीशी साखर एकत्र करू शकता, रात्री झोपण्यापूर्वी हा काढा प्या तसंच तुम्ही चहा मध्ये देखील तुळशीची पाने एकत्र करून पिऊ शकता.

कोरडा खोकला घरगुती उपाय मधामुळे पण  आराम  मिळतो,कोरड्या खोकल्यावर मध अत्यंत फायदेशीर ठरतं, मध हे लाळ ग्रंथी ऍक्टिव्ह करतो, त्यामुळे लाळे निर्मितीची प्रक्रिया वेगाने सुरू होते, त्यामुळे घशातील खवखव दूर होते, आणि खोकला कमी होतो.

हळद आणि दूध हा उपाय त्या सगळ्यांना माहित आहेच, पण एक गोष्ट लक्षात ठेवावी,दूध हे गरम केलेलं असावं गरम केवळ हळद मिक्स करावी आणि त्या गरम दुधातच सेवन करावं,त्यामुळे तुमच्या घशाला आराम मिळतो,आणि कोरडा खोकला लवकरात लवकर दूर होण्यास मदत होते,खडीसाखर खडीसाखर चघळत राहिल्याने कोरडा खोकला बरा होण्यास मदत होते.

खोकला घरगुती उपाय
खोकला घरगुती उपाय

इतकाच नाही तर तुम्ही खडीसाखरेची पावडर करून ती थोड्या थोड्या वेळात खात राहिल्यास तुमच्या घशाला त्रास होत नाही,तसंच तुम्हाला वरचेवर जर खोकल्याचा त्रास होत असेल तर नेहमी खळी साखर तुमच्या जवळ ठेवावी. 

यामुळे कशावर प्रदूषणाचा परिणाम न होता खोकला देखील दूर राहतो,ज्येष्ठमध,ज्येष्ठमध एक औषधी वनस्पती आहे जी कफ दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते मुलेठी मध्ये अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्म असतात जे खोकल्यामुळे होणारी जळजळ कमी करतात.

एक कप गरम पाण्यामध्ये दोन चमचे ज्येष्ठमध एकत्र करा पंधरा मिनिटांसाठी उकळवत ठेवा दिवसभर याचा सेवन करा, यामुळे खोकला कमी होण्यास मदत होते.

आलं आल्याचा वापरही कोरड्या खोकल्यावर गुणकारी ठरतो,सर्दी खोकला झाल्यावर अनेक लोक आल्याच्या चहाचे सेवन करतात,कोरडा खोकला झाल्यावर आल्याचा सेवन खोकल्याची तीव्रता कमी करतो आलं हे एक कप पाण्यामध्ये एकत्र करून गॅसवर थोड्या वेळासाठी उघडावेत ठेवा हे पाणी दिवसभरात थोडं थोडं करून द्या. कोरडा खोकला दूर करण्यासाठी उत्तम पर्याय आहेत.

👉click here to join WhatsApp group 

Leave a Comment